दिन विशेष 30 सप्टेंबर आंतरर्राष्ट्रीय भाषांतर दिन !
बंधु-भगिनींनो जगभरात 30 सप्टेंबर हा आंतरर्राष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो.
हा दिवस भाषांतरांद्वारे विविध भाषेतील ज्ञान,संस्कृती आणि माहितीचा विश्वभरात प्रचार,प्रसार करणार्यांना समर्पित आहे. मित्रांनो भाषांतराद्वारे केवळ माहितीचेच आदान-प्रदान होत नसते तर त्याद्वारे एका देशाला दूरच्या देशातील संस्कृती,विचार आणि समस्यांचेहि ज्ञान होते ह्यामुळे जगभरातील देशांना त्यातील लोकांना एकमेकांना समजून घेणे सोप्पे जाते.
मित्रांनो आज जागतिकेकरणाच्या युगात तर व्यापार,शिक्षण आणि आंतरर्राष्ट्रीय संबंधांपासून अगदि जगभ्रमंतीपर्यंत सर्वच बाबतीत भाषा महत्वाचा मुद्दा ठरते.
मित्रांनो भाषांतराविषयीची काहि मनोरंजक पण तितकीच महत्वाची तथ्य जाणून घेऊ.
1) भाषांतर करणे हे एक कौशल्य तर आहेच पण त्याचसोबत हा एक सर्वात जुना व्यवसायहि आहे.
पोटपाण्याकरता भाषांतरकार बनण्याची सुरवात जवळपास 2000 वर्षांपुर्वी झाली.
ऊपलब्ध माहितीनुसार ख्रिस्तपुर्व काळातील तिसर्या शतकात सर्वात पहिल्यांदा बायबलचे ग्रीक भाषेत भाषांतर घडले.
विश्वातील जवळपास 650 भाषांमध्ये भाषांतरीत झाल्याने भाषांतरीत केल्या गेलेल्या पुस्तकांमध्ये बायबलचा क्रमांक सर्वात वरती येतो.
2) तुम्हाला ठाऊक आहे का आजवरचा सर्वात भीषण असलेला हिरोशिमावरील अणूबॉंब हल्ला चुकीच्या भाषांतराचा परिणाम होता.
दुसरे विश्व युध्द संपल्यावर अमेरिका-ईंग्लंडसारख्या मित्र देशांनी
जपानला शरण येण्यास सांगितले. त्यावेळेस त्याला त्यावेळेच्या जपानी पंतप्रधानांच्या प्रत्युतराचे भाषांतरकारांकडून चुकीचे भाषांतर घडून "ध" चा "मा" घडून त्यामुळे भडकलेल्या अमेरिकेद्वारे तो नृशंस हमला केला गेला.
3) जगातील कोणते साहित्य/माहिती सर्वाधिक भाषांतरीत केली जाते
भाषांतर विश्वाचा विचार करता त्यामध्ये ईंग्रजी, फ्रेंच, जर्मन,ईटालियन आणि रशियन ह्या भाषांमधील साहित्य/माहितीचे सर्वाधिक भाषांतर घडते.
4) भाषांतराकरता सर्वात सोप्पी भाषा कोणती ?
मित्रांनो कदाचित क्षणाचाहि विलंब न लावता तुम्ही म्हणाल ईंग्लिश !
तर माफ करा ऊत्तर चुक आहे कारण विश्वातील अनुभवी भाषांतरकारांच्यामते भाषांतराकरता स्पॅनिश भाषा सर्वात जास्त सोप्पी आहे.
ह्याच कारण म्हणजे स्पॅनिश शब्द जसे दिसतात/लिहिले जातात त्यांचा ऊच्चारहि तसाच असतो त्यामुळेच ती भाषा शिकणे आणि पुढे तिचे भाषांतर करणे ईतर भाषांहून तुलनात्मक सोप्पे आहे.
5) भाषांतराकरता सर्वात कठीण/अवघड भाषा कोणती ?
जाणकारांच्यामते अरेबिक,जपानीज,चायनीज,आईसलॅंडीक आणि पॉलिश ई. भाषा भाषांतराकरता अवघड आहेत. ह्याचे कारण भाषांतरकारांना ईतर भाषांच्या तुलनेत ह्या भाषेमधील माहिती/साहित्यास भाषांतरीत करण्यास अधिक वेळ/अवधी लागतो.
मित्रांनो शरीराने,शक्तीने अनेक सजीवांहून छोटे, दुबळे असुनहि माणूस सर्व जगावर स्वामित्व गाजवू शकला केवळ मेंदूमूळे !
मेंदू सर्वांकडे असुनहि मानवी मेंदू ईतर सर्व प्राण्यांहून भिन्न आणि प्रगत बनला त्यातील नवनविन गोष्टी शिकण्याच्या त्याबद्दल जाणून घेण्याच्या ऊत्सुकतेमुळे आणि मित्रांनो हि ऊत्सुकता क्षमवण्याचे काम केले भाषेने ! त्यामुळेच आपण विचार,कला, साहित्याचे आदान प्रदान करून मेंदूची आणि समस्त मानवजातीची प्रगती साधु शकलो पण खरच भाषांतराशिवाय त्या प्रगतीला किती मर्यादा आल्या असत्या. मित्रांनो प्रत्यक्षात त्याशिवाय ज्ञान,विज्ञान,माहिती,कला आणि संस्कृतीची प्रगतीच मोजक्याच जनसमुदायापर्यंत खुंटली असती. थोडक्यात भाषांतराशिवाय मानव आजहि गुफामानवांप्रमाणे टोळक्या टोळक्यात विभागला असता.
मित्रांनो त्यामुळेच अशा मानवजातीला घडवणार्या भाषांतराच्या चळवळीत भारताची आणि त्यातहि मराठी भाषेची महत्वाची भुमिका नको का ? आपल्या देशाच्या साहित्याला हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्या देशात आणि महाराष्ट्रात एव्हढे थोर संत,महापुरूष,लोकनेते, कवी, लेखक होऊनहि आज भाषांतरीत झालेल्या माहिती/साहित्याच्याबाबतीत भारत आणि आपली मायमराठी ईतके मागे का ?
ह्याचा विचार कृपया प्रत्येकाने करावा आणि धर्म,जात,पक्ष आणि वैयक्तिक हेव्यादाव्यांपेक्षा आपल्या देशाला आणि मायमराठीला मोठ करण्यासाठी एक व्हावे आणि त्याकरताच ह्या सोशल मिडीयारूपी शक्तीचा वापर करावा.
No comments:
Post a Comment