Sunday, September 29, 2019

दिनविशेष 29 सप्टेंबर (वर्ल्ड हार्ट डे) जागतिक हृद्य दिन !

दिनविशेष 29 सप्टेंबर (वर्ल्ड हार्ट डे) जागतिक हृद्य दिन ! बंधु भगिनींनो आज 29 सप्टेंबर म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे म्हणजेच  जागतिक हृद्य दिन !  विश्वामध्ये ह्या आजाराबद्दल जनजागृती होण्याकरता  हा दिवस पाळला जातो. वर्ल्ड हेल्थ फेडरेशनच्या आकडेवारीनुसार हृद्यरोगाने जगभरात प्रतिवर्षी 17.1 दशलक्ष लोकांचा बळी जातो. हे प्रमाण कॅंसर,एड्स,मलेरिया ह्या सर्वाधिक जीवघेण्या आजारांपेक्षाहि बरेच अधिक आहे.       *हृद्यरोगाची कारणे* अति खाणे,अनारोग्यदायी खाण्याच्या सवयी,तळलेले त्यातहि बाहेरचे/हॉटेलमधील  पदार्थ खाणे. (मित्रांनो हॉटेलचे पदार्थ हृद्यरोगाचा धोका कसा वाढवतात त्याविषयी लेखात पुढे) ऊच्च रक्तदाब,कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह ह्या सर्व गोष्टींमुळे हृद्यरोगाचा धोका संभवू शकतो. त्याशिवाय आहारा-विहाराबाबत पुर्ण संयम ठेऊनहि  अतीराग,चिंता,भय अशा भावनांच्या कल्लोळामुळेहि हृद्यरोगाचा विकार जडू शकतो ह्याची विशेष नोंद घ्यावी.   * जागतिक हृद्य दिनाच्या निमित्ताने जगभरात समाजातील जनजागृती वाढवण्याकरता विविध चॅरिटीज आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने ह्या दिवशी चालणे,धावणे,आरोग्य शिबिरासारखे ऊपक्रम राबवले जातात त्याशिवाय चर्चा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातूनहि जनतेमध्ये जनजागृती निर्माण केली जाते. मित्रांनो एखादि गोष्ट कळत असुनहि वळत नाहि बर्याचदा आजची व्यस्त जीवनशैली त्याला कारणीभुत असते त्यामुळेच ह्या वर्ल्ड हार्ट डेच्या माध्यमातून हा संदेश आरोग्यदायी आहार-विहार,व्यायाम,(दारू-धूम्रपानासारख्या व्यसनातून) व्यसनमुक्ती आणि संयमाचे महत्व जगाला सांगतो. त्यातहि पुर्वी वयस्कर व्यक्तींपर्यंत मर्यादित असलेला हा विकार आता तरूण आणि चक्क लहान मुलांनाहि आपल्या विळख्यात घेऊ लागल्याने ह्या जागतिक हृद्य दिनाचे महत्व कैकपटीने वाढले आहे. मित्रांनो हा दिन जणू आपल्या सर्वांनाच एक संदेश देतो "ऊठा जागे व्हा अजुन वेळ गेलेली नाहि. निराश होऊ नका !" त्यामुळेच धुम्रपान,अरबट-चरबट खाण्याला तिलांजली देऊन नियमित व्यायामाद्वारे आणि संतुलित पोषक आहाराचा अवलंब करून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याकरता हा दिवस जणू संपुर्ण विश्वासाठीच शुभ मुहूर्त ठरावा. मित्रांनो बाहेरचे/हॉटेलातील खाणे हृद्यरोगास कसे वाढवते ते आत्ता पाहूया. मित्रांनो काहिवेळेस स्वयंपाकघरात तुम्ही थोडे गडद रंगाचे (काळपट) आणि नेहमीच्या तेलाहून थोडे दाट/घट्ट झालेले तेल पाहिले असेल. साधे तेल ह्या स्वरूपाचे होण्यामागे एक भयंकर रासायनिक प्रक्रिया असते. मित्रांनो डिप फ्रायिंग,तळण्यासारख्या गोष्टीदरम्यान बर्याचदा तेल ऊकळते हा असतो तेलाचा स्मोकिंग पॉईंट !  ह्या तापमानापर्यंत पोहोचल्यानंतर तेलामध्ये एक रासायनिक प्रक्रिया घडते (ऑक्सिडायझेशन,हायड्रोलिसीस,पोलिमरायझेशन) ह्या प्रक्रियेमुळे त्यातील फॅटी ॲसिड्स नामक घातक घटकात बदल होतात/वाढ होते जी शरीरास आणि त्यातहि प्रामुख्याने हृद्याकरता घातक असते. अशा तेलामुळे शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलच्या प्रमाणात वाढ होते ज्यामुळे हृद्यातील धमन्यांमध्ये अडथळे (ब्लॉकेजेस) निर्माण होतात. त्याशिवाय अशा तेलाने ॲसिडीटी,घशाची खवखव/खोकला असा त्रासहि होऊ शकतो पण हृद्यरोगाच्या धोक्यापुढे ते नगण्य आहे. मित्रांनो महाग असल्याकारणाने एखाद्या घरात तळलेले पदार्थ अधिक बनत असल्यास त्याकरता पुन्हा पुन्हा तेच तेल वापरण्याची सवय असते. ती फार घातक !  कारण एकदा ऊकळलेले हे तेल जितक्यावेळेस गरम होऊन स्मोक पॉईंटपर्यंत पोहोचते तितकेच त्या तेलातील  घातक पदार्थाचे प्रमाण वाढून ते घातक अधिक घातक होत जाते. मित्रांनो घरापेक्षाहि  बाहेरच्या म्हणजेच हॉटेलमधील पदार्थ बनवण्याकरता तेलाचा पुन:र्वापर खुप अधिक होत असल्यानेच हॉटेलचे जेवण त्यातहि वडा,समोसा ई. तळलेले.पदार्थ हृद्यरोगाला खुले निमंत्रण ठरू शकतात. ह्याकरताच घरातहि तळलेले पदार्थ कमीच केलेले बरे !  पण महागाईमुळे तळण्याकरता वापरलेले तेल फेकून देणे अनेकांना न पटल्यास त्या तेलाचा वापर फोडणी देणे किंवा पीठ मळण्यासाठी केल्यास त्याचा वापर होऊनहि त्याचे पुन्हा पुन्हा ऊकळणे टाळता येईल. मित्रांनो शरीर आणि हृद्याच्या ऊत्तम आरोग्याकरता तज्ञ आहारातील कर्बोदकांऐवजी प्रथिन,जीवनसत्व ई. चे प्रमाण वाढवण्यास सांगतात. त्याकरताच गहू-तांदळापेक्षा आहारात भाज्या,डाळींचा,फळांचा अधिक समावेश केल्यास त्याकरता थोडे  अधिक पैसे खर्च करावे लागतील पण तसे न केल्यास होणार्या हृद्यरोगासारख्या आजारांवर होणारे लाखो रूपए वाचवताहि येतील. मित्रांनो जनजागृतीकरता हि माहिती शेअर करून अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचवावी. - मकरंद सुधाकर पाटोळे.

No comments:

Post a Comment