Monday, September 30, 2019

दिन विशेष 30 सप्टेंबर  आंतरर्राष्ट्रीय भाषांतर दिन !

दिन विशेष 30 सप्टेंबर  आंतरर्राष्ट्रीय भाषांतर दिन !

बंधु-भगिनींनो जगभरात 30 सप्टेंबर हा आंतरर्राष्ट्रीय भाषांतर  दिन म्हणून ओळखला जातो.
हा दिवस भाषांतरांद्वारे विविध भाषेतील ज्ञान,संस्कृती आणि माहितीचा विश्वभरात प्रचार,प्रसार करणार्यांना समर्पित आहे. मित्रांनो भाषांतराद्वारे केवळ माहितीचेच आदान-प्रदान होत नसते तर त्याद्वारे एका देशाला दूरच्या देशातील संस्कृती,विचार आणि समस्यांचेहि ज्ञान होते ह्यामुळे जगभरातील देशांना त्यातील लोकांना एकमेकांना समजून घेणे सोप्पे जाते.
मित्रांनो आज जागतिकेकरणाच्या युगात तर व्यापार,शिक्षण आणि आंतरर्राष्ट्रीय संबंधांपासून अगदि  जगभ्रमंतीपर्यंत  सर्वच बाबतीत भाषा महत्वाचा मुद्दा ठरते.


मित्रांनो भाषांतराविषयीची काहि मनोरंजक पण तितकीच महत्वाची तथ्य जाणून घेऊ.

1) भाषांतर करणे हे एक कौशल्य तर आहेच पण त्याचसोबत हा एक सर्वात जुना व्यवसायहि आहे.

पोटपाण्याकरता भाषांतरकार बनण्याची सुरवात जवळपास 2000 वर्षांपुर्वी झाली.
ऊपलब्ध माहितीनुसार ख्रिस्तपुर्व काळातील तिसर्या शतकात सर्वात पहिल्यांदा बायबलचे ग्रीक भाषेत भाषांतर घडले.
विश्वातील जवळपास 650 भाषांमध्ये भाषांतरीत झाल्याने   भाषांतरीत केल्या गेलेल्या पुस्तकांमध्ये बायबलचा क्रमांक सर्वात वरती येतो.


2) तुम्हाला ठाऊक आहे का आजवरचा सर्वात भीषण असलेला हिरोशिमावरील अणूबॉंब हल्ला चुकीच्या भाषांतराचा परिणाम होता.

दुसरे विश्व युध्द संपल्यावर अमेरिका-ईंग्लंडसारख्या मित्र देशांनी
जपानला शरण येण्यास सांगितले. त्यावेळेस त्याला त्यावेळेच्या जपानी पंतप्रधानांच्या प्रत्युतराचे भाषांतरकारांकडून चुकीचे भाषांतर घडून "ध" चा "मा" घडून त्यामुळे भडकलेल्या अमेरिकेद्वारे तो नृशंस हमला केला गेला.


3) जगातील कोणते साहित्य/माहिती सर्वाधिक भाषांतरीत केली जाते

भाषांतर विश्वाचा विचार करता त्यामध्ये ईंग्रजी, फ्रेंच, जर्मन,ईटालियन आणि रशियन ह्या भाषांमधील साहित्य/माहितीचे सर्वाधिक भाषांतर घडते.



4) भाषांतराकरता सर्वात सोप्पी  भाषा कोणती ?

मित्रांनो कदाचित क्षणाचाहि विलंब न लावता तुम्ही म्हणाल ईंग्लिश !
तर माफ करा ऊत्तर चुक आहे कारण विश्वातील अनुभवी भाषांतरकारांच्यामते भाषांतराकरता स्पॅनिश भाषा सर्वात जास्त सोप्पी आहे.
ह्याच कारण म्हणजे स्पॅनिश शब्द जसे दिसतात/लिहिले जातात त्यांचा ऊच्चारहि तसाच असतो त्यामुळेच ती भाषा शिकणे आणि पुढे तिचे भाषांतर करणे ईतर भाषांहून तुलनात्मक सोप्पे आहे.


5) भाषांतराकरता सर्वात कठीण/अवघड भाषा कोणती ?

जाणकारांच्यामते अरेबिक,जपानीज,चायनीज,आईसलॅंडीक आणि पॉलिश ई. भाषा भाषांतराकरता अवघड आहेत.  ह्याचे कारण भाषांतरकारांना ईतर भाषांच्या तुलनेत ह्या भाषेमधील माहिती/साहित्यास भाषांतरीत करण्यास अधिक वेळ/अवधी लागतो.

मित्रांनो शरीराने,शक्तीने अनेक सजीवांहून छोटे, दुबळे असुनहि माणूस सर्व जगावर स्वामित्व गाजवू शकला केवळ मेंदूमूळे !
मेंदू सर्वांकडे असुनहि मानवी मेंदू  ईतर सर्व प्राण्यांहून भिन्न आणि प्रगत बनला त्यातील नवनविन गोष्टी शिकण्याच्या त्याबद्दल जाणून घेण्याच्या ऊत्सुकतेमुळे आणि मित्रांनो हि ऊत्सुकता क्षमवण्याचे काम केले भाषेने ! त्यामुळेच आपण विचार,कला, साहित्याचे आदान प्रदान करून मेंदूची आणि समस्त मानवजातीची प्रगती साधु शकलो पण खरच भाषांतराशिवाय त्या प्रगतीला किती मर्यादा आल्या असत्या. मित्रांनो प्रत्यक्षात त्याशिवाय ज्ञान,विज्ञान,माहिती,कला आणि संस्कृतीची प्रगतीच मोजक्याच  जनसमुदायापर्यंत खुंटली असती.  थोडक्यात भाषांतराशिवाय मानव आजहि  गुफामानवांप्रमाणे टोळक्या टोळक्यात विभागला असता.

मित्रांनो त्यामुळेच अशा मानवजातीला घडवणार्या भाषांतराच्या चळवळीत भारताची आणि त्यातहि मराठी भाषेची महत्वाची भुमिका नको का ?  आपल्या देशाच्या साहित्याला हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्या देशात आणि महाराष्ट्रात एव्हढे थोर संत,महापुरूष,लोकनेते, कवी, लेखक होऊनहि आज भाषांतरीत झालेल्या माहिती/साहित्याच्याबाबतीत भारत आणि आपली मायमराठी ईतके मागे का ? 
ह्याचा विचार कृपया प्रत्येकाने करावा आणि धर्म,जात,पक्ष आणि वैयक्तिक हेव्यादाव्यांपेक्षा आपल्या देशाला आणि मायमराठीला मोठ करण्यासाठी एक व्हावे आणि त्याकरताच ह्या  सोशल मिडीयारूपी शक्तीचा वापर करावा.


- मकरंद सुधाकर पाटोळे.

Sunday, September 29, 2019

दिनविशेष 29 सप्टेंबर (वर्ल्ड हार्ट डे) जागतिक हृद्य दिन !

दिनविशेष 29 सप्टेंबर (वर्ल्ड हार्ट डे) जागतिक हृद्य दिन ! बंधु भगिनींनो आज 29 सप्टेंबर म्हणजेच वर्ल्ड हार्ट डे म्हणजेच  जागतिक हृद्य दिन !  विश्वामध्ये ह्या आजाराबद्दल जनजागृती होण्याकरता  हा दिवस पाळला जातो. वर्ल्ड हेल्थ फेडरेशनच्या आकडेवारीनुसार हृद्यरोगाने जगभरात प्रतिवर्षी 17.1 दशलक्ष लोकांचा बळी जातो. हे प्रमाण कॅंसर,एड्स,मलेरिया ह्या सर्वाधिक जीवघेण्या आजारांपेक्षाहि बरेच अधिक आहे.       *हृद्यरोगाची कारणे* अति खाणे,अनारोग्यदायी खाण्याच्या सवयी,तळलेले त्यातहि बाहेरचे/हॉटेलमधील  पदार्थ खाणे. (मित्रांनो हॉटेलचे पदार्थ हृद्यरोगाचा धोका कसा वाढवतात त्याविषयी लेखात पुढे) ऊच्च रक्तदाब,कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह ह्या सर्व गोष्टींमुळे हृद्यरोगाचा धोका संभवू शकतो. त्याशिवाय आहारा-विहाराबाबत पुर्ण संयम ठेऊनहि  अतीराग,चिंता,भय अशा भावनांच्या कल्लोळामुळेहि हृद्यरोगाचा विकार जडू शकतो ह्याची विशेष नोंद घ्यावी.   * जागतिक हृद्य दिनाच्या निमित्ताने जगभरात समाजातील जनजागृती वाढवण्याकरता विविध चॅरिटीज आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने ह्या दिवशी चालणे,धावणे,आरोग्य शिबिरासारखे ऊपक्रम राबवले जातात त्याशिवाय चर्चा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातूनहि जनतेमध्ये जनजागृती निर्माण केली जाते. मित्रांनो एखादि गोष्ट कळत असुनहि वळत नाहि बर्याचदा आजची व्यस्त जीवनशैली त्याला कारणीभुत असते त्यामुळेच ह्या वर्ल्ड हार्ट डेच्या माध्यमातून हा संदेश आरोग्यदायी आहार-विहार,व्यायाम,(दारू-धूम्रपानासारख्या व्यसनातून) व्यसनमुक्ती आणि संयमाचे महत्व जगाला सांगतो. त्यातहि पुर्वी वयस्कर व्यक्तींपर्यंत मर्यादित असलेला हा विकार आता तरूण आणि चक्क लहान मुलांनाहि आपल्या विळख्यात घेऊ लागल्याने ह्या जागतिक हृद्य दिनाचे महत्व कैकपटीने वाढले आहे. मित्रांनो हा दिन जणू आपल्या सर्वांनाच एक संदेश देतो "ऊठा जागे व्हा अजुन वेळ गेलेली नाहि. निराश होऊ नका !" त्यामुळेच धुम्रपान,अरबट-चरबट खाण्याला तिलांजली देऊन नियमित व्यायामाद्वारे आणि संतुलित पोषक आहाराचा अवलंब करून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याकरता हा दिवस जणू संपुर्ण विश्वासाठीच शुभ मुहूर्त ठरावा. मित्रांनो बाहेरचे/हॉटेलातील खाणे हृद्यरोगास कसे वाढवते ते आत्ता पाहूया. मित्रांनो काहिवेळेस स्वयंपाकघरात तुम्ही थोडे गडद रंगाचे (काळपट) आणि नेहमीच्या तेलाहून थोडे दाट/घट्ट झालेले तेल पाहिले असेल. साधे तेल ह्या स्वरूपाचे होण्यामागे एक भयंकर रासायनिक प्रक्रिया असते. मित्रांनो डिप फ्रायिंग,तळण्यासारख्या गोष्टीदरम्यान बर्याचदा तेल ऊकळते हा असतो तेलाचा स्मोकिंग पॉईंट !  ह्या तापमानापर्यंत पोहोचल्यानंतर तेलामध्ये एक रासायनिक प्रक्रिया घडते (ऑक्सिडायझेशन,हायड्रोलिसीस,पोलिमरायझेशन) ह्या प्रक्रियेमुळे त्यातील फॅटी ॲसिड्स नामक घातक घटकात बदल होतात/वाढ होते जी शरीरास आणि त्यातहि प्रामुख्याने हृद्याकरता घातक असते. अशा तेलामुळे शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलच्या प्रमाणात वाढ होते ज्यामुळे हृद्यातील धमन्यांमध्ये अडथळे (ब्लॉकेजेस) निर्माण होतात. त्याशिवाय अशा तेलाने ॲसिडीटी,घशाची खवखव/खोकला असा त्रासहि होऊ शकतो पण हृद्यरोगाच्या धोक्यापुढे ते नगण्य आहे. मित्रांनो महाग असल्याकारणाने एखाद्या घरात तळलेले पदार्थ अधिक बनत असल्यास त्याकरता पुन्हा पुन्हा तेच तेल वापरण्याची सवय असते. ती फार घातक !  कारण एकदा ऊकळलेले हे तेल जितक्यावेळेस गरम होऊन स्मोक पॉईंटपर्यंत पोहोचते तितकेच त्या तेलातील  घातक पदार्थाचे प्रमाण वाढून ते घातक अधिक घातक होत जाते. मित्रांनो घरापेक्षाहि  बाहेरच्या म्हणजेच हॉटेलमधील पदार्थ बनवण्याकरता तेलाचा पुन:र्वापर खुप अधिक होत असल्यानेच हॉटेलचे जेवण त्यातहि वडा,समोसा ई. तळलेले.पदार्थ हृद्यरोगाला खुले निमंत्रण ठरू शकतात. ह्याकरताच घरातहि तळलेले पदार्थ कमीच केलेले बरे !  पण महागाईमुळे तळण्याकरता वापरलेले तेल फेकून देणे अनेकांना न पटल्यास त्या तेलाचा वापर फोडणी देणे किंवा पीठ मळण्यासाठी केल्यास त्याचा वापर होऊनहि त्याचे पुन्हा पुन्हा ऊकळणे टाळता येईल. मित्रांनो शरीर आणि हृद्याच्या ऊत्तम आरोग्याकरता तज्ञ आहारातील कर्बोदकांऐवजी प्रथिन,जीवनसत्व ई. चे प्रमाण वाढवण्यास सांगतात. त्याकरताच गहू-तांदळापेक्षा आहारात भाज्या,डाळींचा,फळांचा अधिक समावेश केल्यास त्याकरता थोडे  अधिक पैसे खर्च करावे लागतील पण तसे न केल्यास होणार्या हृद्यरोगासारख्या आजारांवर होणारे लाखो रूपए वाचवताहि येतील. मित्रांनो जनजागृतीकरता हि माहिती शेअर करून अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचवावी. - मकरंद सुधाकर पाटोळे.

Friday, September 27, 2019

दिनविशेष 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस





*दिनविशेष 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिन*

बंधु-भगिनींनो आज 28 सप्टेंबर म्हणजेच जागतिक रेबीज दिन ! दरवर्षी देशात रेबीजने हजारोंचे बळी जातात म्हणून त्याविषयी काहि महत्वाचे जाणून घेऊ.


*रेबीज महत्वाची  माहिती*

लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम रेबीजच्या लसीचा शोध लावला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रेबीज रोगाचे मनुष्य व पशुमध्ये नियंत्रण व जागरूकता निर्माण करून समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो.
भारतात दरवर्षी 50 हजार लोकांचा मृत्यू फक्त रेबीज रोगाने होतो. तर लाखभर लोक श्वान दंशामुळे पिडीत होतात. रेबीज हा आजार प्राणघातक असल्याने तसेच यावर प्रभावी उपचार नसल्याने प्रतिबंधक उपायाला खूप महत्व आहे. यासाठी दिनांक 28 सप्टेंबर, रोजी जागतिक रेबीज दिनानिमित्त पशवैद्यकीय विभागामार्फत श्वानांना लसीकरण करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येते.

माणसांसोबतच जनावरांमध्ये प्रामुख्याने गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, घोडे आणि  कुत्र्यांमध्ये पिसाळणे ही विकृती कुत्रा चावल्यामुळे होते.
कुत्र्याचा कुत्र्यांना किंवा इतर पाळीव प्राण्यांना किंवा माणसाला चावा घेण्याला श्‍वानदंश म्हणता येईल. याच श्‍वानदंशामुळे रेबीज हा #विषाणूजन्य आजार होतो.

पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज या रोगाकडे इतर विषाणूजन्य रोगाप्रमाणे एवढे गांभीर्याने पाहिले जात नाही. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मानवाचा किंवा पशूचा जीव जाण्याची शक्यता जास्त असल्यामुळे या रोगाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तरच जागतिक आरोग्य संघटनेचे "मिशन झीरो रेबीज २०३०" हे उद्दीष्ट साध्य करणे शक्य होईल.

मित्रांनो रेबिज संसर्गित श्वान त्याचे आयुर्मान असेपर्यंत ६० वेळा चावा घेऊ शकते.

आपल्या शेजारील गोवा राज्यात येत्या २०२० पर्यंत गोवा राज्य ‘रेबिजमुक्त’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी शहर आणि ग्रामीण भागात फिरून भटके श्वान शोधण्याचे काम मागच्या काहि वर्षांपासून  सुरू आहे.
गोव्यात २०१४ साली रेबिज संसर्गित श्वानांनी चावा घेतल्याने १७ जणांचा मृत्यू झाला होता.



मित्रांनो रेबीज हा विषाणुजन्य रोग आहे. रेबीजचा प्रसार खालील बाबींमुळे होतो.

रेबीजने बाधीत कुत्रा, मांजर, माकड, लांडगा, कोल्हा, वटवाघुळ व मुंगुस आदी रेबीज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. पिसाळलेला कुत्रा माणसाला किंवा प्राण्याला चावला तर लाळेमध्ये असलेले विषाणू जखमेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर मज्जातंतूद्वारे मध्यवर्ती मज्जा संस्थेत प्रवेश करतात. रोगजंतूचा शरीरात प्रसार चावा घेतलेली (विषाणू बाधीत) जागा व मेंदूपासून अंतर यावर अवलंबून असते. मेंदू व बाधीत जागेतील अंतर जेवढे कमी तेवढी रोगाची लक्षणे लवकर दिसतात. तोंडाजवळ चावलेल्या जखमेपेक्षा पायावर चावलेल्या जखमेतून मेंदूचे अंतर जास्त असल्याने हा काळ बराच जास्त म्हणजे काही आठवडे किंवा काही महिने ते वर्ष इतका असू शकतो. एका ठिकाणी चावा घेतल्यापेक्षा दोन तीन ठिकाणी चावा घेतलेल्या जनावरात, माणसात रोगाची लक्षणे लवकर व अधिक तिव्रतेने दिसू शकतात. रेबीजची लक्षणे रेबीजग्रस्त कुत्रा, मांजर चावल्यानंतर सर्वसाधारणपणे 20 ते 30 दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. परंतू काही वेळा यापेक्षाही अधिक काळ म्हणजे काही महिने ते वर्ष लागतात.


जनावरात आढळणारे रेबीजचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात.
1 ) मुका किंवा शांत कमी आक्रमक प्रकार
2) चवताळलेला किंवा आक्रमक प्रकार
कुत्रा व गाई म्हशीत वरील दोन्ही प्रकार दिसून येतात. तर मांजर, कोल्हा, लांडगे या प्राण्यात चवताळलेला प्रकार अधिक असतो. आपल्या देशात मुख्यत्वेकरुन चवताळलेला रेबीजचा प्रकार अधिक प्रमाणात आढळतो.



1) कमी आक्रमक  (कमीघातक)प्रकार

➡️ या प्रकारात कुत्र्याच्या हालचाली कमी होऊन ते सुस्त व आळशी बनतात. माणसापासून दुर राहतात. घरामध्ये कुठेतरी कोपऱ्यात किंवा फर्निचर खाली अंधाऱ्या जागेवर जाऊन बसतात. अशा कुत्र्यांना ओरडता येत नाही. कुत्र्यांचा खालचा जबडा लुळा पडतो व लाळ गळते. ते थरथर कापतात, त्यांना लुळेपणा येतो. जमिनीवर पडून राहतात. अशावेळेस शांत अवस्थेत काहि दिवसात  दिवसात कुत्र्याचा मृत्यू होतो.

2) आक्रमक  प्रकार :- या प्रकारात कुत्रे निरनिराळी लक्षणे दाखवतात. कुत्र्याचे खाण्यापिण्यावर लक्ष राहात नाही. रोजच्या सवयीत बदल होतो, कुत्रा मालकाचे आदेश पाळत नाही. एकाकी   राहतो, लाळ गाळतो. यापुढील अवस्थेत कुत्रा संबंधित माणसापासून दूर राहतो. कुत्रा अतिशय उत्तेजित होतो. मोकळा सोडल्यास रस्त्यातील येण्या-जाणार्या प्राण्यांचा अगदि निर्जीव वस्तुंचाहि चावा घेतो, विनाकारण भुंकतो त्यावेळेस भुंकण्याचा आवाज वेगळा घोगरा येतो किंवा आवाज बंद होतो.
एखादि वस्तू उदा. लाकडाचा तुकडा, दगड इत्यादी चघळतो किंवा गिळून टाकतो,खूप दूरवर पळत जातो.
एरव्ही मालकाची ओढ असलेला कुत्राहि अशावेळेस बऱ्याचदा  घरी परत येत नाही. थोड्या थोड्या वेळाने लघवी करतो,  लाळ गाळण्याचे प्रमाण वाढते, डोळे लालभडक होतात. पक्षाघात किंवा पंगू होण्याची अवस्था चार ते सात दिवसांपर्यंत राहते.
तोंडाच्या खालचा जबडा लुळा पडतो व जीभ बाहेर येते,मान खाली किंवा वाकडी होते,शेपटी सरळ दिसते, कुत्रा अडखडत झोकांड्या खात चालतो आणि नंतर चक्कर येऊन पडतो. मागचे पाय लुळे पडल्याने उभा राहू शकत नाही अखेर  श्वासोच्छवास बंद पडल्याने कुत्र्याचा मृत्यू होतो.


➡️ चवताळलेल्या किंवा (तीव्र) प्रकारात जनावरे अतिशय उग्र होतात. माणसाच्या अंगावर धावून येतात. शिंगे किंवा डोके झाडावर किंवा भिंतीवर आदळतात. डोळे लाल होतात, तोंडाला फेस येतो, गाय-बैलांच्या बाबतीत चारा खाणे व रवंथ करणे बंद होते, बैल वारंवार थोडी थोडी लघवी करतात.
जनावरे घोगऱ्या आवाजात ओरडतात.



     
👇*माणसातील लक्षणे*👇

माणसात पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर साधारणपणे 10 ते 90 दिवसात रोगाची लक्षणे दिसतात. तीव्र डोकेदुखी, ओकारी आल्यासारखी वाटते. नाका-डोळ्यातून पाणी वाहणे / गळणे, घशाला कोरड येणे, जेवण न करणे व पाणी पिणे बंद होणे, पाण्याची भिती वाटायला लागते. चेहऱ्यावरचे स्नायू निष्प्राण होतात. जसजसा हा विषाणू मेंदूचा ताबा घेतो तसतसे क्लेशदायक झटके येतात. घेतलेले द्रवपदार्थ तोंडावाटे बाहेर पडतात. अखेरीस रोगी बेशुध्द होतो आणि 7 ते 10 दिवसात मृत्यू पावतो.



          *प्रथमोपचार*

कुत्रा किंवा मांजर चावल्यास त्वरीत ती जखम धावत्या पाण्याखाली पकडून धुऊन टाकावी. त्यानंतर जंतूनाशक मलम लावावे. जखम स्वच्छ केल्यावर हात स्वच्छ धुवावेत. जखमेतून रक्त जर जास्त प्रमाणात वाहत असेल तरच त्यावर पट्टी बांधावी. जखमेवर हळद, चुना किंवा इतर कुठलेली पदार्थ लावू नयेत. जखमेवर टाके देऊ नयेत.



         *रोगाची कारणे*

हा रोग लायसाया विषाणूमुळे होतो.
श्वानांचे १०० टक्के लसीकरण करून बचाव करता येणारा हा रोग प्रामुख्याने पिसाळलेल्या जनावराने चावा घेतल्यास, ओरखडल्यास किवा त्यांच्या लाळेचा व आपल्या उघड्या जखमेचा संपर्क आल्यास होतो.
वटवाघुळाच्या शरीरामध्ये सुद्धा हे विषाणू आढळतात, म्हणून वटवाघूळ चावल्यामुळेसुद्धा रेबीज होऊ शकतो .
रेबीजची लागण झालेल्या प्राण्यांच्या लाळेतून व उघड्या जखमेचा, कापलेले बोट ई. चा लाळेशी संपर्क आल्यास रेबीजचा प्रसार होतो.






ह्या कमी आक्रमक प्रकारात जनावराच्या कातडीला स्पर्श केला तरी त्याला त्याची जाणीव होत नाही.

 *रेबीज कसा होतो*

पिसाळलेले जनावर चावल्यास त्याच्या लाळेद्वारे विषाणू जनावरांच्या मांसपेशीत प्रवेश करून तेथे त्यांची वाढ होते व मज्जातंतूद्वारे शरीरभर पसरतात.
पिसाळलेले जनावर प्राणी किवा मनुष्य ह्यांना मेंदूच्या अंतरापासून शरीरावर कुठे चावा घेते, त्यानुसार रेबीज विषाणू चा प्रसार कालावधी अवलंबून असतो.
हात किवा पाय यांच्या तुलनेत मानेजवळ अथवा डोक्याला (मेंदूजवळ) चावा घेतल्यास विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो व रेबीजची लक्षणे दिसू लागतात .
मांसपेशीतील मज्जातंतूंमध्ये विषाणू त्यांची संख्या वाढवून मेंदूमध्ये दाह निर्माण करतात आणि लाळग्रंथी मध्ये पोचून लाळ दूषित करतात व असे जनावर दुसऱ्या पशूना अथवा मनुष्यास चावल्यास त्याला रेबीज रोगाचा प्रादुर्भाव होतो. जोपर्यंत पिसाळलेल्या जनावरांवर नियंत्रण येत नाही, तोपर्यंत असे प्रादुर्भावाचे चक्र चालूच राहते.
लागण झालेल्या पशूंच्या विविध प्रकारच्या मांसपेशी सैल बनतात उदा. श्‍वसनसंस्थेच्या व जबड्याच्या मांसपेशी सैल झाल्यामुळे जनावरास श्‍वास घेण्यास अडथळा होतो व पाणी पिण्यास असमर्थ होऊन जनावर दगावते.




    *जनावरातील लक्षणे*

श्वान व इतर जनावरांमध्ये रेबीजची लक्षणे विविध प्रकारांत आढळून येतात.

जनावर आक्रमक होते किंवा मंद बनते. श्वान बऱ्याचदा धावत सुटतात व दिसेल त्या पशू व मनुष्यास चावा घेण्याचा प्रयत्न करते.
जबड्याच्या स्नायूंना पक्षाघात झाल्यामुळे जबडा बंद करता येत नाही, त्यामुळे जास्त प्रमाणात संसर्गित लाळ गळते.
श्वान भूंकण्याचा प्रयत्न करते, पण आवाज बसका व व्यथित रडल्यासारखा येतो, अशावेळी अंधाराचा व अडचणीच्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न करते.
मेंदू व चेतासंस्थेवर झालेल्या परिणामामुळे जनावरांमध्ये खुंट्या भोवती गोल गोल फिरने, झाडावर किंवा भिंतीवर डोके आपटण्याची लक्षणे दिसून येतात.

जनावर आपल्या मालकास ओळख दाखवत नाही व आवाजास प्रतिसाद देत नाही.
गळ्याच्या आणि जबड्याच्या मांसपेशी सैल पडल्याने तहान लागूनसुद्धा जनावर पाणी पिण्यास असमर्थ बनते व पाण्याला घाबरते म्हणून यास जलटंका किंवा जलद्वेष असेही म्हणतात.
जनावर लाकूड, खडे खाण्याचा प्रयत्न करते व निर्जीव वस्तूंवर किंवा माणसांवर धावून येते.
जनावर सतत हंबरते, कान टवकारते व उधळण्याचा प्रयत्न करते.
श्वासोच्छवासाला मदत करणारे स्नायू लुळे पडल्यामुळे श्वासोच्छवास बंद पडून जनावर दगावते.




       *प्रतिबंधात्मक उपाय*

लसीकरण करणे हाच प्रतिबंधात्मक ऊपाय हाच ह्यावर उत्तम पर्याय आहे

कोणताही कुत्रा चावल्यास खबरदारी म्हणून लगेच प्रतिबंधात्मक उपाय करावेत.
चावा घेतलेली जखम धावत्या/नळाच्या पाण्यात साबणाने स्वच्छ धुवावी.
जखमेवर संसर्ग टाळण्यासाठी हळद किंवा आयोडीन लावावे.
जखमेवर पट्टी बांधू नये व जखमेस टाके मारू नये .
रेबीज प्रतिबंधात्मक लस पशूंना कुत्रा चावलेल्या दिवशी, तिसऱ्या, सातव्या, चौदाव्या, अठ्ठावीसाव्या व नव्वदाव्या दिवशी पशुवैद्यकाकडून तर मनुष्यास नजीकच्या सरकारी दवाखान्यात नेवून टोचून घ्यावी.


*कुत्रा चावलेल्या जनावरांबाबत घ्यावयाची काळजी*

कुत्रा चावलेल्या जनावरांवर १०-१२ दिवस लक्ष ठेवावे.
संशयित अथवा रेबीज झालेले जनावर इतर जनावरांपासून वेगळे बांधावे.
संसर्गित जनावरांचा चारा, पाणी वेगळे ठेवावे.
संसर्गित जनावरांच्या नैसर्गिक स्रावांच्या (लाळ, लघवी, डोळ्यातील पाणी) संपर्कात स्वतः आणि इतर जनावरांना येऊ देऊ नये
दगावलेल्या जनावराचे मल-मूत्र, चारा, पाणी यांची योग्य ती विल्हेवाट लावावी.

पाळीव कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस वयाचे ३ महिने होताच टोचून घ्यावी व वार्षिक डोस निर्धारित तारखेत द्यावा.



   *रेबीज रोगाचे नियंत्रण व उच्चाटन*

भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर अटकाव आणण्यासाठी त्यांची नसबंदी करणे आवश्यक आहे.
शाळा व महाविद्यालयात जाऊन रेबीज रोग, लसीकरण व त्याबद्दल उपाय योजनाची जागरूकता निर्माण करणे.

पाळीव प्राण्यांचे लसीकरण वेळेवर करून रेबीज रोगावर पूर्णपणे नियंत्रण अाणता येते.
पाळीव प्राण्यांची स्थानिक प्रशासन संस्थेमध्ये नोंदणी करून त्याचे लायसंस (पाळीव परवाना) काढून घ्यावा.


- मकरंद सुधाकर पाटोळे.